सावित्रीबाई फुले यांची मराठी मध्ये माहिती वाचा.... ह्या पोस्ट मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती दिलेली आहे तसेच हि माहिती तुम्ही PDF मध्ये सुद्धा Download करून ठेवू शकता. PDF link पेज च्या अखेरीस दिली गेली आहे...
-------------------------------
सावित्रीबाई फुले : सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला त्या नायगाव (ता.खंडाळा, जि. सातारा) येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत, इ. स. १८४० मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्यावेळी योतिबांचे वय तेरा वर्षाचे तर सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षांचे होते. लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या.
- जन्म : 3 जानेवारी 1831
- मृत्यू : 10 मार्च 1897
- पूर्ण नाव : सावित्रीबाई जोतीराव फुले
- टोपणनाव : ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
- वडील : खंडोजी नेवसे (पाटील)
- आई : सत्यवती नेवसे
- अपत्ये: यशवंत फुले
- चळवळ: मुलींची पहिली शाळा सुरु करणे
- पुरस्कार: क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य :
म. १८४८ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्योतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः घरी शिक्षण दिले व नंतर त्यांची शिक्षिका म्हणून शाळेत नेमणूक केली. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या.
बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकविणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत होता. पुण्यातील उच्चवर्णीयांना व सनातनी लोकांना याचा अतिशय संताप आला त्यांनी सावित्रीबाईंना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाई शाळेत जात-येत असताना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत आणि निंदानालस्ती करीत. काही कर्मठ लोक त्यांच्या अंगावर चिखल- शेण फेकीत त्यांना दगड मारीत पण सावित्रीबाईंनी आपले काम निष्ठेने चालू ठेवले.सनातनी लोकांनी ज्योतिबांच्या वडिलांचे कान भरले. त्यामुळे आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे हे त्यांना मानवले नाही / इ स १८४९ मध्ये गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले.
इ.स १८६३ मध्ये महात्मा फुल्यानी विधवा स्त्रियांच्या निराधार मुलासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले या गृहातील अनाथ मुलांची काळजी घेण्याचे काम सावित्रीबाई करीत या अनाथ मुलावर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत व त्याची सर्व प्रकारची सेवा करीत त्याना स्वतःला अपत्य नव्हते. पुढे अशाच एका अनाथ मुलाला ‘यशवंता’ ला त्यांनी दत्तक घेतले) (इ. स. १८९० मध्ये महात्मा फुले याचे निधन झाले. पुढे सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा सावित्रीबाईनी वाहिली (इ. स. १८९३ मध्ये सासवड येथील सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईनी भूषविल)
- ३ जानेवारी १८३१ - सातारा जिल्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी जन्म.
- १८४० - ज्योतिराव फूले यांच्याबरोबर विवाह
- १८४१ - शिक्षणास प्रारंभ.
- १८४७ - शिक्षक प्रशिक्षण.
- १ जानेवारी १८४८ - पुणे येथे भिडे वाड्यात मुलींच्या पाहिल्या शाळेची स्थापना, सावित्रीबाई शिक्षिका झाल्या.
- १ मे १८४९ - पुणे येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात प्रौढाच्या शाळेची स्थापना आणि सावित्रीबाईंचे अध्यापन कार्य.
- १८४९-५० - पुणे - सातारा-नगर या जिल्यांत शाळेची स्थापना आणि त्यातील काही शाळा शिक्षिका म्हणून कार्य.
- १८४९ - वंचितांच्या शिक्षणासाठी पती ज्योतिरावांबरोबर गृहत्याग.
- १८५२ - शाळाची तपासणी व आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय.
- १२-२-१८५३ - मेजर क्यंडी यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा विश्रामबाग वाड्यात गौरव आणि सर्व शाळान्चा एकत्र पार पाडलेला बक्षिस समारंभ.
- १८५३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आणि सावित्रीबाईंचे यासाठी कार्य.
- १८५४ - काव्यफुले या कविता संग्रहाचे प्रकाशन.
- १८५५ - रात्रशाळेची स्थापना.
- २५-१२-१८५६- ज्योतिबांची भाषणे हे पुस्तक प्रकाशित केले.
- १८६० - विधवा पुनर्विवाहास सहाय्य.
- १८६४ - अनाथ बालकाश्रम चालविला.
- १८६८ - घरचा हौद अस्पृशांसाठी खुला.
- २४.९.१८७३ - सत्यशोधक समाजाची स्थापना.
- १८७५ ते १८७७ - पुणे परिसरात ५२ अन्नछत्रे उघडून सत्यशोधक समाजातर्फे चाललेल्या दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व.
- २८.११.१८९० - पती महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन.
- १०.३.१८९७ - प्लेग क्रांतिज्योतीचे महानिर्वाण
सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा :
काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर, मातोश्री सावित्रीबाई भरणे व गाणी इत्यादी.
सावित्रीबाई फुले यांची विशेषता :
- महाराष्ट्रातील स्त्री-मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी.
- पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका.
- त्यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन म्हणून पाळण्यात येतो.
-------------------------------
PDF links :
SavitriBai Fule - information in Marathi <<click here>>
Insert the comment below for any help or for more Project material... 😊
pdigitaleducation.blogspot.com Share With your friends and keep supporting.
Comments
Post a Comment